जळगाव शहराचा पाणी पुरवठा पुन्हा लांबला, वाचा सविस्तर..
खान्देश टाइम्स न्यूज । २५ ऑगस्ट २०२३ । जळगाव शहरातील पाणी पुरवठा कधी पुढे ढकलला जाईल याचा काही अंदाजच नाही. २० दिवसापूर्वी पाणीपुरवठा पुढे ढकलण्यात आला होता आता पुन्हा उद्या दि.२६ ऑगस्ट रोजीचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.
जळगाव शहर महानगरपालिकेने जारी केलेल्या प्रेस नोटनुसार, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मार्या. यांनी एमआयडीसी सेक्टर मधील मनपाची ३३ केव्ही वाघूर वीज वाहिनीचे फिडर देखभाल दुरुस्तीचे काम करणे करीता दि.२६ रोजी होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे जळगांव शहराचा पाणी पुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात येत आहे.
दि.२६ रोजीचा होणाऱ्या भागाचा पाणी पुरवठा दि.२७ रोजी करण्यात येईल. तसेच दि.२७ रोजी व २८ रोजीचा पाणी पुरवठा अनुक्रमे दि.२८ व २९ रोजी करण्यात येईल. तरी नागरीकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा व महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.