सावदा;- येथे गौसिया नगर मध्ये ४ रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास नवीन पेय जल बोरिंगची कामाची सुरुवात माजी नगरसेवक फिरोज खान पठाण यांच्या हस्ते करण्यात आली. गौसिया नगरातील या कामाबाबत नागरिकांनी आनंद व्यक्त केले असून माजी नगरसेवक फिरोज़ खान पठाण यांचे आभार मानले
माजी नगरसेवक फिरोज खान पठाण यांनी आपल्या कार्यकुशलतेने परिसरातील नागरिकांसाठी विविध कामे केली असून उशिरा का होईना मात्र थेट काम करणे हि त्यांच्या कार्याची शैली असून याचा नागरिकांना पुन्हा अनुभाव आला आहे.
नवीन पेय जल योजना राबविण्याचे आश्वासन फिरोज खान पठाण यांनी दिले होते ते आज पुर्ण झाले आहे . अनेक वर्षांपासून या भागात नागरिकांना पिण्याचा पाण्याची समस्यां जाणवत होती. उन्हाळ्यात तर पाण्यासाठी नागरिकांची वणवण होत असल्याचे चीटर होते. मात्र आता उन्हाळ्यातही या परिसरातील नागरिकांना पाण्याची टंचाई भासणार नाही . नागरिकांना या भागात मुबलक पाणी उपलब्ध व्हावे यासाठी फिरोज खान पठाण यांनी पाठपुरावा करून सावदा नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी एक ठराव मंजूर केला . त्यानुसार गौसिया नगर व सुगंगा नगर मध्ये नवीन पेय जल बोरिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. याचा नागरिकांना लाभ होणार असून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. पाणीपुरवठा कर्मचारी अविनाश पाटील, अख्तर खान ,अमान उल्ला खान, इरफान लुकमान ,रज्जाक पिंजारी, इरफान इस्माईल, अमजद मिस्त्री, मेहेताब भाई, शेख रऊफ ,रवी भाऊ ,शेख अरबाज़, राहुल तायडे, सागर वाणी ,अज्जू गुलाब ,प्रवीण पाटील, साहिल चौध,री तसेच गौसिया नगरचे रहिवासी उपस्थित होते.