धरणगाव ;- तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या 42 वर्षीय विधवा महिलेस दारूच्या नशेत डोक्यात दगड मारून दुखापत करून तिची छेडछाड करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी एका विरुद्ध धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की धरणगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या ४२ वर्षीय शेती काम करणाऱ्या विधवा महिलेच्या घराच्या मागील बाजूस ३ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास आरोपी विकास पाटील रा. धरणगाव तालुका याने दारूच्या नशेत शिवीगाळ करून हातातील दगडाने तिच्या डोक्यात मारून दुखापत करून हात पकडून छेडछाड केली . तसेच तिला पुन्हा मारहाण करून शिवीगाळ केल्याप्रकरणी आरोपी विकास पाटील यांच्याविरुद्ध धरणगाव पोलीस स्टेशनला पीडित महिलेच्या फिर्यादीवरून ३ रोजी सायंकाळी सहा वाजता विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक फौजदार करीम सय्यद करीत आहे.