चाळीसगाव : चारचाकीतून आलेल्या पाच जणांनी भाजपचे माजी नगरसेवक बाळासाहेब मोरे यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केल्याची धक्कादायक घटना बुधवार दि. ७ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास हनुमानवाडी परिसरात घडली. यामध्ये बाळासाहेब मोरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ नाशिक येथे हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे चाळीसगावात खळबळ माजली असून ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
शहरातील भाजपचे माजी नगरसेवक बाळासाहेब मोरे हेत्यांच्या रेल्वे स्थानकाजवळील नेहमीप्रमाणे बसले होते. सायंकाळीहनुमानवाडीतील कार्यालयात पाच वाजेच्या सुमारास चारचाकीवाहनाने पाच जण कार्यालयाच्या बाहेर आले. गाडीतून उतरताच ते श्री. मोरे यांच्या कार्यालयात शिरले आणि समोर बसलेल्या मोरे यांच्यावर त्यांनी अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. हल्लेखोरांनी मोरे यांच्यावर सहा गोळ्या झाडल्यानंतर हल्लखोर वाहनात बसून पसार झाले. बाळासाहेबत यांच्या सहकाऱ्यांसह पांसह त्यांना तत्काळ शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी उपचार केल्यानंतर त्यांना नाशिक येथे हलविण्यात आले आहे. पोलिसांची
माजी नगरसेवक बाळासाहेब मोरे यांच्यावर गोळीबार झाल्याची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यासह कर्मचारी त्याठिकाणी दाखल झाले. याठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली होती.
गोळीबाराची घटना सीसीटीव्हीत कैद
गोळीबाराची संपूर्ण घटना त्याठिकाणी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांनी ते फुटेज ताब्यात घेतले असून त्यानुसार पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरु आहे. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
पूर्ववैमनस्यातून झाला हल्ला
हल्लेखोरांनी बाळासाहेब मोरे यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केल्यामुळे त्यांच्या छातीला, पोटाला आणि पायाला गोळी लागलेली आहे. त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना पुढील उपचारार्थ नाशिक येथे हलविण्यात आले असून मोरे यांच्यावर पुर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याची चर्चा शहरात सुरु आहे.