जळगांव

Breaking : जळगावात इमारत कोसळली, महिला ढिगाऱ्याखाली अडकली

खान्देश टाइम्स न्यूज | २९ ऑगस्ट २०२३ | जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगरात मंगळवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास एक जुनी इमारत कोसळली. इमारती खाली एक महिला अडकली असून तिला बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू झाले आहे.

जळगाव शहरात अनेक जुन्या इमारती असून मनपा प्रशासनाने त्या मालमत्ताधारकांना नोटीस देखील बजावल्या आहेत. मंगळवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज नगरातील मस्जिद समोर असलेली एक जुनी इमारत ९ वाजेच्या सुमारास अचानक कोसळली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली राजश्री सुयोग पाठक वय – ५२ ही महिला अडकली असून तिला बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू झाले आहे.

घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली असून पोलिसांनी धाव घेतली आहे. इमारत जीर्ण झालेली असल्याने त्यात फारसे कुटुंब रहिवास करीत नसल्याने मोठी हानी टळली आहे. जळगाव शहरातील इतर जीर्ण इमारतींच्या बाबतीत मनपा प्रशासनाने लवकरात लवकर कठोर पाऊले न उचलल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button