खान्देशगुन्हेजळगांव

सव्वा कोटीची फसवणूक केल्याप्रकरणी चाळीसगावच्या १३ जणांविरुद्ध गुन्हा

जळगाव ;- चाळीसगाव तालुक्यातील करगाव शिवारातील गट न. २०४/२/२ पैकी ०. ७० आरच्या भूसंपादन वाढीव नुकसान भरपाई साठी न्यायालयात सादर केलेले खोटे शपथपत्र व दस्तावेज सादर करून न्यायालयाची दिशाभूल करून फिर्यादीसह इतर लाभार्थ्यांची १ कोटी २५ लाख ४० हजार ३९३ रुपये व्याजासह प्राप्त करून स्वताच्या फायद्यासाठी वापरल्या प्रकरणी १३ जणांविरुद्ध जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, फिर्यादी तात्या गणपत चव्हाण वय २५ रा. करगाव ता. चाळीसगाव हे शेतकरी असून त्यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, करगाव शिवारातील गट न. २०४/२/२ पैकी ०. ७० आरच्या भूसंपादन वाढीव नुकसान भरपाई साठी दाखल एल ए आर नं. १४६८/१९९८ नुसार दाव्यात रे.द. नं. ४४२/२०२९ मध्ये फिर्यादी तात्या गणपत चव्हाण आणि इतर लाभार्थ्याना २२ जानेवारी २००७ ते १ जुलै २०१७ दरम्यान दाखल दाव्यात संशयित आरोपी इंदुबाई भास्कर चव्हाण,तुळशीराम भास्कर चव्हाण,कैलास भास्कर चव्हाण,विलास भास्कर चव्हाण ,वैशाली भास्कर चव्हाण ,कौशलया भास्कर चव्हाण,शेवंताबाई बद्रीनाथ चव्हाण ,ईश्वर बद्रीनाथ चव्हाण, विनोद बद्रीनाथ चव्हाण ,विनोद बद्रीनाथ चव्हाण,दीपक उर्फ शिवा बद्रीनाथ चव्हाण, राहुल बद्रीनाथ चव्हाण , जनाबाई काळू वंजारी, धर्मा धमना वंजारी सर्व रा. करगाव ता. चाळीसगाव यांनी न्यायालयात खोटे शपथपत्र व दस्तऐवज सादर करून न्यायालयाची दिशाभूल करून वाढीव भूसंपादनाचा मोबदला १,२५,४०,३९३ /- रुपये व्याजासह प्राप्त करून स्वतःच्या फायद्यासाठी वापरून न्यायालयाच्या आदेशानंतरही न्यायालयात दाखल केली नसल्याने जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. तपास सहाय्य्क पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button