मुंबई ;;- राज्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिला आहे. त्यांनी तस पत्र लिहिलं आहे.तसेच त्यांनी आमदारकीचाही राजीनामा दिला असून ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचं जवळपास निश्चित आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर झालेल्या विश्वास ठरावाच्या वेळी अशोक चव्हाण यांच्यासह काही आमदार उपस्थित होते. तेव्हापासूनच अशोक चव्हाण यांच्याबद्दल सतत काही ना काही चर्चा सुरू होती. काही महिन्यांपूर्वी अशोक चव्हाण यांनी स्वत: ही चर्चा फेटाळून लावली होती. मात्र, आता पुन्हा एकदा ही चर्चा सुरू झाली आहे.
अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू असताना ते स्वत: नॉट रिचेबल आहेत. त्यांचे स्वीय सहाय्यक व स्वीय सचिव यांचेही फोन लागत नाहीत. त्यामुळं शंकेला बळ मिळालं आहे. चव्हाण यांच्यासोबत नांदेड जिल्ह्यातील व मराठवाड्यातील एक-दोन पाच ते सात आमदारही भाजपमध्ये प्रवेश करतील, असं सांगितलं जात आहे.