अमळनेर ;- येथील बसस्थानक आवारातून महिलेच्या गळ्यातील ५० हजार रूपये किंमतीच ३० ग्रॅम वजनाची सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याचा प्रकार सोमवारी १२ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता उघडकीस आला असून याप्रकरणी सायंकाळी ५ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, उषाबाई पितांबर पाटील वय- ६७ रा. चौबारी ता. अमळनेर ह्या वृध्द महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. सोमवारी १२ फेब्रुवारी रोजी गावातील नातेवाईकांसह अंत्यविधीसाठी बाहेरगावी निघाले. दरम्यान दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास ते अमळनेर बसस्थानकात आल्यानंतर अमळनेर – मांडळ बस मध्ये चढत असतांना अज्ञात चोरट्यांनी उषाबाई पाटील यांच्या गळ्यातील ३० हजार रूपये किंमतीची सोन्याची मंगलमोत अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली.
हा प्रकार लक्षात आल्यानंतर वृध्द महिलेने आरडाओरड केली. परंतू मंगलपोतची कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात दुपारी ४ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ चंद्रकांत पाटील हे करीत आहे.