जळगाव : शहरातील मेहरून तलाव जवळील उद्यानाजवळ रेकॉर्डवरील गुन्हेगारांजवळ गावठी कट्टे असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाल्यावर दोन जणांना दोन गावठी कट्टे बाळगताना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एक दुचाकी हस्तगत करण्यात आले आहे त्यांचा तिसरा साथीदार मात्र घटनास्थळावरून फरार झाला .
ही कारवाई गुरुवार. 29 रोजी रात्री जे.के.पार्क मेहरुण बगीचा येथे करण्यात आली. दीपक लक्ष्मण तरटे (26, नागसेन नगर, रामेश्वर कॉलनी, जळगाव) व अमन रशीद सैय्यद उर्फ खेकडा (21, सुप्रीम कॉलनी, जळगाव) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत रसंशयित विशाल राजू अहिरे हा पसार झाला आहे. अटकेतील संशयितांकडे प्रत्येकी एक गावठी कट्टे आढळले तर बजाज पल्सर (एम.एच.19 डी.यु.4565) जप्त करण्यात आली.
आरोपींना चार दिवसांची कोठडी
अटकेतील दीपक लक्ष्मण तरटे (26, नागसेन नगर, रामेश्वर कॉलनी, जळगाव) व अमन रशीद सैय्यद उर्फ खेकडा (21, सुप्रीम कॉलनी, जळगाव) यांच्या विरोधात कॉन्स्टेबल किरण प्रकाश पाटील यांनी फिर्याद दिल्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्यायमुर्ती वसीम एम.देशमुख यांनी चार दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली. सरकारतर्फे अॅडव्होकेट स्वाती निकम यांनी बाजू मांडली.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, उपनिरीक्षक दीपक जगदाळे, उपनिरीखक दत्तात्रय पोटे, एएसआय अतुल वंजारी, हवालदार सचिन मुंढे, हवालदार गणेश शिरसाळे, रामकृष्ण पाटील, किशोर पाटील, सचिन पाटील, योगेश बारी, सुधीर सावळे, किरण पाटील, छगन तायडे, ललित नारखेडे, राहुल रगडे यांनी केली आहे. अमन रशीद सैय्यद उर्फ खेकडा हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी एकुण 18 गुन्हे दाखल आहेत तर दीपक लक्ष्मण तरटे याच्याविरोधात चार गुन्हे दाखल आहे.