खान्देशगुन्हेजळगांव

मेहरूण परिसरात गोळीबार केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा

जळगाव – : 18 वर्षीय तरुणावर जुन्या वादातून गोळीबार झाल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवार, 1 मार्च रोजी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील श्रीराम कन्या शाळेजवळ घडला. याप्रकरणी चौघांविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोहम गोपाल ठाकरे (18, मेहरुण, जळगाव) हा तरुण शुक्रवार, 1 मार्च रोजी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास उभा असताना तेथे संशयित दीक्षांत सपकाळे,गोपाळ चौधरी,व अन्य दोन जण अनोळखी हे त्या ठिकाणी येऊन दीक्षांत याने जुना वाद उकरून वाद घातला . यावेळी गोपाळ चौधरी याने कमरेला असलेल्या पिस्तुलातून सोहंच्या दिशेने गोळीबार केला . मात्र सोहं वेळीच पळून गेल्याने तो बचावला. हि घटना जळगाव शहरातील श्रीराम कन्या शाळेनजीक घडली . शहरात भरदिवसा झालेल्या गोळीबारानंतर अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत, गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन पाटील, एमआयडीसी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, सहाय्यक निरीक्षक दयानंद सरवदे यांच्यासह एमआयडीसी पोलिसांनी धाव घेतली. याप्रकरणी चौघा संशयितांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button