जळगाव : कामावरुन काढून टाकल्याचा राग आल्याने तीन जणांना दोघांनी चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच मॅनेजर चेतन सोनवणे यांच्यावर धारदार चाकूने वार करीत गंभीर जखमी केले. ही घटना दि. १ मार्च रोजी दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास कानळदा – येथील सरकारी दवाखान्याजवळ – घडली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील भोकर – येथे चेतन पुंडलीक सोनवणे (वय ३२) हे वास्तव्यास असून ते एका न कंपनीत मॅनेजर म्हणून नोकरी करतात. त्यांच्या कंपनीत महेश भरत सोनवणे यांच्यासह अन्य दोन जणांना चेतन सोनवणे यांनी कानळदा गावाजवळील घटना ; तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
कंपनीतून काढून टाकले. त्याचा राग त्यांच्या मनात होता. चेतन सोनवणे हे दि. १ रोजी दुपारच्या सुमारास कानळदा येथील सरकारी दवाखान्याजवळून जात असतांना महेश सेनवणे याच्यासह तिघांनी चेतन सोनवणे त्यांचे मित्र विशाल बाबुलाल सोनवणे व सचिन देवीदास सोनवणे या तिघांना शिवीगाळ करीत माहराण केली. त्यानंतर महेश याने त्याच्या खिशातून चाकू काढून चेतन यांच्यावर वार केले. यामध्ये त्यांच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. याप्रकरणी महेश भरत सोनवणे (रा. कानळदा) याच्यासह अन्य दोघांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक उमेश ठाकूर हे करीत आहे