एलसीबीच्या पथकाची कारवाई ; चार मोटरसायकली हस्तगत
जळगाव (प्रतिनिधी) ;-जिल्ह्यात दुचाकी चोरीचे गुन्हे वाढले असून जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून मोटरसायकली चोरून त्यांची परस्पर विल्हेवाट लावणाऱ्या चोरट्याला एलसीबीच्या पथकाने अटक केली असून त्याच्याकडून एक लाख तीस हजार रुपयांच्या चार मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहे गोपाल तेली वय 42 रा. कळमसरा तालुका पाचोरा असे या चोरट्याचे नाव आहे.
. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की शहर पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटरसायकल ही पाचोरा तालुक्यातील कळमसरा येथील गोपाल तेली वय 42 हा वापरत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून त्याची विचारपूस केली असता त्याने व त्याच्या साथीदाराने जळगाव जिल्ह्यातून मोटरसायकली चोरल्याचे कबूल केले. यात जळगाव शहर पोलीस स्टेशन, जिल्हा पेठ पोलीस स्टेशन, भुसावळ बाजार पेठ पोलीस स्टेशन, आणि चोपडा शहर पोलीस स्टेशन मध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यातील चार मोटरसायकली चोरल्याचे गुन्हे दाखला आहेत.
आरोपी गोपाल तेली याला पुढील कार्यवाहीसाठी जळगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गजानन देशमुख ,विनोद पाटील ,विष्णू बिराडे ,ईश्वर पाटील ,राहुल महाजन यांच्या पथकाने केली.