जळगाव ;- महाराष्ट्र शासनस्तरावरून राज्यभरातील प्रत्येक तालुक्याच्या विकासासाठी मोठा निधी दिला जात असून अनेक आमदारांच्या मतदारसंघात विकासांची कामे होत असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी दिली. चाळीसगांव येथील नूतन उपविभागीय उपप्रादेशिक कार्यालयाच्या उद्घघाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी पाणी पुरवठा व स्वछता मंत्री गुलाबराव पाटील, आ. मंगेश चव्हाण, आ.किशोर पाटील,आ.मंगेश चव्हाण, आ.संजय सावकारे,आ.राज भोळे,माजी आमदार स्मिता वाघ,संजय गरूड, जिल्हा बॅक अध्यक्ष संजय पवार,उपप्रादेशिक परिवहन विभागाचे उपआयुक्त श्याम लोही,मुख्यधिकारी प्रशांत ठोंबरे,प्रांतधिकारी प्रमोद हिले,अप्पर पेलिस अधीक्षक कविता नेरकर,आदीसह आजी माजी जिल्हा परिषद,पंचायत समिती ,नगरपालिका सदस्य व पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
उपविभागीय उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची निर्मिती झाल्याने नागरिकांनी देखील आता वाहतूकी संदर्भातील नियमावली पाळणे गरजेचे असल्याचे सांगून वाहतुकीचे नियम मोडणार्यावर कठोर कारवाई करावी जेणेकरून त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी हेाईल यासाठी नागरिकांनी देखील परिवहन विभागाच्या कर्मचार्यांना सहकार्य करण्याचे आवाहन ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी केले.
हेमंत जोशी पटागंणावर उभारण्यात आलेले हे कार्यालय तात्पुरते असून नवीन कार्यालयासाठी ४० कोटी रूपये मंजूर करण्यात आले असून लवकरचं नवीन कार्यालय बांधण्यात येणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली. यावेळी त्यांनी आ.मंगेश चव्हाण यांच्या कार्यपध्दतीचे कौतुक करतांना आपल्या मतदारसंघातील विकासकामासाठी संबंधित मंत्र्याकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करून निधी मिळवून घेतात.
त्यामुळेच जिल्हयातील इतरांपेक्षा जादा निधी चाळीसगांवला येतो.
जळगांव जिल्हयाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, आ.मंगेेश चव्हाण यांचा नेत्यांशी व मंत्र्यांशी असलेला संपर्क राहून शासनाच्या विविध योजनेतून मोठा निधी आणून विकासकामे करतात.त्यांच्या कामाचा सपाटा नक्कीच कौतुकास पात्र आहे.
आमदार किशोर पाटील यांनी देखील आपले मनेागत करतांना आ.मंगेश चव्हाण यांच्यामुळेच उपप्रादेशिक परिवहन विभागाचे उपविभागीय कार्यालय चाळीसगांव येऊ शकले असे सांगितले.
आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या मतदारसंघात सुरू असलेल्या विकासकामांची माहिती देतांना सांगितले की, शासनाच्या विविध योजनेतून चाळीसगांव मतदारसंघात निधी येत असून आगामी काळात चाळीसगांव तालुका व शहरात दर्जेदार रस्ते तयार करण्यात येणार आहे.नगरविकास विभागाकडून शहरातील रस्त्यांसाठी करोडो रूपयांचा निधी प्राप्त झाला असून त्यांच्या कार्य आरंभ आदेश देखील निघाले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.उपविभागीय ग्रामीण रूग्णालयासाठी देखील निधी मंजूर झाला असून असे विविध विकास कामे होत आहेत. ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांचे सहकार्य असल्यामुळे हे कामे होतं असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी प्रांतधिकारी प्रमोद हिले,उपप्रादेशिक परिवहन विभागाचे उपआयुक्त शाम लोही ,आ.राजू भोळे,माजी आमदार स्मिता वाघ,आरटीओ प्रतिनिधी सुधाकर भावसार,वाहन वितरक हर्षद ढाके,मोटार ड्रायव्हिंग स्कूल प्रतिनिधी संदीप हडप,अमोल पाटील,यांनी मनेागत व्यक्त केले.ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागीय कार्यालय तसेच तालुका क्रिडा संकुलातील बहुउद्देशीय हॉल व इतर विकास कामांचे ऑनलाईन उद्धघाटन करण्यात आले.चाळीसगांव उपप्रादेशिक उपविभागीय कार्यालयातून एम.एच ५२ या क्रमांकाची सिरीज सुरू करण्यात आली असून नेांदणी करून नवीन क्रमांक घेणार्या वाहनमालकांचा सत्कार यावेळी करण्यात आला.