पारोळा ;- सबगव्हाण खुर्द या शहरापासून काही अंतरावर असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 53 वर टोल नाक्याचे काम पूर्ण झाले नसतानाच हा टोल नाका सोमवारपासून सुरू केला जात असतानाच कारमधून आलेल्या अज्ञातांनी टोल नाक्याच्या कॅबीन पेटवत तोडफोड केल्याचा प्रकार रविवारी मध्यरात्री घडल्याने खळबळ उडाली आहे. कारमधून आलेले हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.
सबगव्हाणचा हा टोल नाका सुरू करण्यास पारोळत्त तालुक्यातील नागरिकांनी विरोध दर्शवला होता. याबाबत रविवारी तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले होते.
सोमवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास एका विना क्रमांकाच्या कारमधून आलेल्या व आपले तोंड फडक्याने झाकलेल्या टोळक्याने कॅबिनमध्ये पेट्रोल टाकून कॅबीन पेटवून दिली. यानंतर त्यांनी दुसर्या कॅबीनसह अन्य भागांची तोडफोड करत पलायन केले. अवघ्या काही मिनिटांमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे टोल नाक्याचे मोठे नुकसान झाले. हा सर्व प्रकार सीसीटिव्हीमध्ये चित्रीत झाला आहे.