भुसावळ : – मुंबईतील मलबार हिल पोलीस ठाण्याच्या हद्दीत तापीया हाईटस, पेपिअन्सो रोड भागात घर मालकीन महिलेचा ३ लाखांच्या सोन्याच्या बांगड्यांसाठी खून करून पसार झालेल्या संशयित आरोपीच्या बुधवारी भुसावळात मुसक्या आवळण्यात आल्या.
रेल्वे लोहमार्ग, आरपीएफ व बाजारपेठ पोलिसांनी संयुक्त कारवाई करुन बिहारमधील आरोपी कन्हैय्याकुमार संजय पंडित (वय १९) यास डाऊन रक्सोल एक्स्प्रेसमधून अटक केली.
मलबार हिल पोलीस ठाणे हद्दीतील ज्वेलरी व्यावसायिक मुकेश गुलाबचंद शहा (वय ६७) यांच्याकडे संशयित कन्हैय्याकुमार पंडित हा ११ मार्चला कामाला लागला होता. शहा हे मुलीसह ११ रोजी दुकानावर असताना घरी त्यांच्या पत्नी ज्योती शहा (वय ६७) व नोकर कन्हैय्या कुमार होते. घरी कुणी नसल्याची संधी साधून आरोपीने घर मालकिण ज्योती यांचा गळा आवळला व त्यांच्या हातातील ३ लाखांच्या हिरेजडीत बांगड्या चोरून पळ काढला.
सायंकाळी ज्योती शहा यांना फोनला प्रतिसाद न दिल्याने खुनाचा प्रकार उघड झाला. तर नोकर पसार झाल्याचे लक्षात आल्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, हा संशयित डाऊन एलटीटी- रक्सोल एक्स्प्रेसमधून पसार झाल्याची माहिती त्याच्या छायाचित्रासह भुसावळातील यंत्रणांना कळवण्यात आली. त्यानंतर आरपीएफ, लोहमार्ग पोलिीस आणि बाजारपेठ पोलीस करीत आहे .