जळगाव ;- दुचाकी चोरांना भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या पथकाने बुलढाणा जिल्ह्यातून अटक केली आहे. त्यांच्याकडून १२ दुचाकी जप्त करण्यात आल्या असून संशयित ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
बाजारपेठ पो.स्टे. भुसावळ येथे दि. २५ जून २०२३ रोजी दुचाकी चोरी झालेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचे तपास पोहेकॉ विजय नेरकर हे करीत आहे. तपास दरम्यान मिळालेल्या गुप्त बातमीच्या अनुषंगाने पोलिसांनी बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद, संग्रामपूर येथून तीन संशयितांना अटक केली आहे. यात शेख बासीद शेख बाबु (वय २८, रा. सुलतानपुरा, जळगाव जामोद, जि. बुलढाणा हल्ली मु. मोहम्मदी नगर, भुसावळ), मोहम्मद अयाज मोहम्मद एजाज (वय २५ रा. सुलतानपुरा, जळगाव जामोद), रविंद्र अंबादास घोडसे (वय ४८, रा. पळसोडा ता. संग्रामपुर जि. बुलढाणा) यांना ताब्यात घेण्यात आले.
त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. तपासादरम्यान तिन्ही संशयित आरोपीतांनी भुसावळ, जळगांव जामोद जि. बुलढाणा, बुऱ्हाणपुर (एम.पी), येथुन ईतर मोटर सायकल चोरी केल्याबाबतची कबुली दिल्याने तपासादरम्यान एकुण ४ लाख ६५ हजार रुपये किमतीच्या हिरो होन्डा, हिरो, बजाज कंपनीच्या एकुण १२ मोटरसायकली जप्त करण्यात आले आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांचे मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठ पो.स्टे.चे पो.निरी. गजानन पडघन, पो.उपनि. मंगेश जाधव, पो.हवा. विजय नेरकर, पोहेकॉ यासीन पिंजारी, पोहेकॉ महेश चौधरी, पोहेकाँ/समाधान पाटील, पोहेकॉ.निलेश चौधरी, पोहेकॉ रमन सुरळकर, पोहेकॉ उमाकांत पाटील, पोना/दिनेश कापडणे, वरिष्ट पोकॉ सचिन चौधरी, पोकॉ राहुल वानखेडे, पोकॉ भुषण चौधरी, पोकों जावेद शाह, पोकों प्रशांत सोनार, पोकॉ/योगेश महाजन, पोकों प्रशांत परदेशी, पोकॉ योगेश माळी, पोकों अमर अढाळे अशांनी कायदेशीर कार्यवाही केलेली आहे.