तरुणाचा विहिरीत पडल्याने बुडून मृत्यू
चाळीसगाव – २८ वर्षीय तरुणाचा विहिरीत पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील श्यामवाडी येथी घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रेवननाथ संभाजी माळी (वय-२८, रा. शामवाडी ता.चाळीसगाव) असे मयततरुणाचे नाव आहे. चाळीसगाव तालुक्यातील श्यामवाडी येथे रेवणनाथ माळी हा आपल्या परिवारासह वास्तव्याला होते. दरम्यान शुक्रवार १५ मार्च रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास गावाजवळील एका विहिरीत पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान ही वार्ता गावात पसरल्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. मृतदेह बाहेर काढून चाळीसगाव येथे रवाना करण्यात आला. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक भगवान माळी हे करीत आहे.