धुळे ;- मनपा क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांच्या विकास योजनेअंतर्गत सर्वे नंबर 436 येथे प्लेग्राउंड व मिनी अम्युझमेंट पार्क या चार कोटी रुपये कामाच्या लोकार्पण आ.फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आले.
धुळे शहरात आ.फारुख शाह यांचे हस्ते प्रथमच धुळे शहरातील अम्युझमेंट पार्क साठी निधी उपलब्ध करण्यात आलेला आहे. धुळे शहरात विरंगुळ्या साठी एक सुद्धा गार्डन नसल्यामुळे महिला आणि मुलांना कुठेच फिरण्याची अशी सोय नाही तसेच वयोवृद्धांना सुद्धा कुठेच मॉर्निंग वॉक व फिरण्याची सोय नसल्यामुळे हे बघून आ.फारुख शाह यांनी धुळे शहराच्या महिला ना सोयीचे होईल असे अम्युझमेंट पार्कसाठीव प्ले ग्राउंड साठी शासनाकडून निधी उपलब्ध करून दिलाअन त्याचे लोकार्पण करण्यात आले .
अल्पसंख्याक भागात एक सुद्धा गार्डन नसल्यामुळे या भागातील महिलांना मुलांना कुठेच विरंगुळ्या साठी गार्डन नव्हते या पार्कमध्ये मुलांसाठी खेळणी व वाटर पार्क सारखे साधन आहे तसेच सुंदर असे गार्डन आहे व यामध्ये संध्याकाळी व सकाळी मॉर्निंग वॉक साठी वृद्धांना जागा सोडण्यात आलेली आहे यामुळे पार्कमुळे या भागातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे व आमदार फारुक यांच्या कामाचा झपाटा बघता या भागातील नागरिकांनी आभार मानले आहे .
या कार्यक्रमाला आ. फारुख शाह यांचे सोबत छोटू शाह,गणी डॉलर,आमिर पठाण,साजिद साई,डॉ.दीपश्री नाईक, फातेमा अन्सारी, प्यारेलाल पिंजारी,निजाम सैय्यद,आसिफ शाह, डॉ.बापुराव पवार,डॉ.शराफत अली, आसिफ मुल्ला,परवेज शाह,सउद सरदार,रफिक शाह पठाण, हालीम शमसुद्दिन,कैसर अहमद,शहजाद मन्सुरी, गफ्फार शेख,शाहिद शाह,नजर पठाण,सलमान खान,शादाब खाटीक,फकिरा बागवान, आबिद मन्सुरी, नईम शेख, कौसर शाह,अबरार शाह, सउद आलम,समीर मिर्झा,शाहेदा अन्सारी,अकिला सैय्यद,रिझवाना शेख,परवीन शेख यांच्यासह मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते.