खान्देशजळगांवदेश-विदेशराजकीयशासकीय

मनसे महायुतीमध्ये सामील होणार ; राज ठाकरे यांची अमित शहांसोबत बैठक

नवी दिल्ली ;- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर असून राज ठाकरे आणि त्यांचा मुलगा अमित ठाकरे यांची आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची चर्चा झाली. मात्र या भेटीमध्ये मनसेला बरोबर घेण्याची चर्चा झाल्याचं समजतं आहे. मात्र बैठकीचा तपशील अद्याप समोर आलेला नाही.

दरम्यान राज ठाकरे हे महायुतीमध्ये सामील होणार असल्याची जोरदार चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात असून या भेटीमध्ये लोकसभेच्या जागावाटपावर चर्चा झाल्याची माहिती आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मनसेला एक किंवा दोन जागा मिळू शकतात असं सांगितलं जातंय. तसेच मनसेचा महायुतीमध्ये समावेश झाल्याची घोषणाही केली जाण्याची शक्यता आहे.

राज ठाकरे हे सोमवारी संध्याकाळी दिल्लीमध्ये पोहोचले. त्यानंतर मंगळवारी भाजप आणि मनसेमध्ये लोकसभेच्या जागावाटपावरून चर्चा पार पडली. दक्षिण मुंबईची जागा ही राज ठाकरेंना सोडण्याचा निर्णय भाजपने घेतला असल्याची माहिती समोर येत आहे. या ठिकाणाहून मनसेचे बाळा नांदगावकर किंवा अमित ठाकरे निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तविली जात आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button