मुंबई ;- एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेले प्रदीप शर्मा यांना मुंबई उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. लखन भय्या फेक एन्काऊंटर प्रकरणात प्रदीप शर्मांना दोषी ठरवण्यात आलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात प्रदीप शर्मांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायमूर्ती गौरी गोडसे आणि रेवती डेरे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.या प्रकरणातला निकाल राखून ठेवण्यात आला होता
या प्रकरणात एकूण १६ याचिका आल्या होत्या. या प्रकरणी ८ नोव्हेंबर २०२३ रोजी निकाल राखून ठेवला होता. आज हा निकाल देण्यात आला. या निकालात २००६ मध्ये झालेल्या लखन भैय्या बनावट एन्काऊंटर प्रकरणात प्रदीप शर्मांना दोषी ठरवण्यात आलं होतं. या प्रकरणात आता त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.