जळगांवशिक्षणसामाजिक

यशस्वी झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी समाज विकासासाठी पुढे यावे – आ. किशोर दराडे

लाडवंजारी युवा संघटनेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ

जळगाव ;- विद्यार्थ्यांनी यशासाठी मेहनत घेण्याची नेहमी तयारी ठेवली पाहिजे. मेहनतीतूनच आपल्याला अपेक्षित यश मिळत असते. यशासाठी कुठलाच शॉर्टकट नाही. निरंतर अभ्यास आणि अपेक्षित यश असे हे समीकरण असून विद्यार्थ्यांनी यशस्वी झाल्यानंतर समाजाच्या विकासासाठी पुढे आले पाहिजे, असे प्रतिपादन विधान परिषदेचे शिक्षक आ. किशोर दराडे यांनी केले.

समस्त लाडवंजारी समाज श्रीराम मंदिर संस्था, मेहरूण व जळगाव जिल्हा वंजारी युवा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी, बारावी व इतर परीक्षांमध्ये गुणवंत झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. प्रसंगी मंचावर अध्यक्षस्थानी आ.किशोर दराडे उपस्थित होते. प्रसंगी मंचावर कबचौ उमविच्या व्यवस्थापन परिषद सदस्या सुरेखा पालवे, मनपा उपायुक्त गणेश चाटे, जेष्ठ कवी वा.ना.आंधळे, मुख्याधिकारी विकास नवाळे, पीएसआय दत्तात्रय पोटे, अमळनेर नगरपरिषदेचे लेखापाल चेतन गडकर, सहायक अभियंता ईश्वर पढार, उपसरपंच आनंदा सांबळे, विष्णू चकोर, जामनेरच्या नगरसेविका किरण पोळ, नगरसेवक राजेंद्र पाटील, अशोक लाडवंजारी, श्रीराम मंदिर संस्था अध्यक्ष चंद्रकांत लाडवंजारी, वंजारी युवा संघटनेचे अध्यक्ष व नगरसेवक प्रशांत नाईक उपस्थित होते.

सुरुवातीला संत भगवान बाबा आणि दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथाराव मुंडे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून मान्यवरांनी दीपप्रज्वलन केले. प्रस्तावनेमधून संघटनेच्या कामाविषयी आढावा घेऊन कार्यक्रमाविषयी अध्यक्ष प्रशांत नाईक यांनी माहिती दिली. यानंतर माननीय शिक्षक आमदार किशोर जी दराडे यांना समाज भूषण पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आला नंतर दहावी, बारावी आणि इतर परीक्षांमध्ये गुणवंत झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, सेवानिवृत्ती कर्मचारी पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचाही पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यूपीएससी परीक्षा प्राप्त गौरव गायकवाड आणि संगणक अभियांत्रिकी परीक्षेतील विजेती माधुरी घुगे यांचाही सत्कार झाला.

तसेच, आ. दराडे यांना समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. कार्यक्रमात विकास नवाळे म्हणाले की, समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांनी कठोर श्रम करून उत्तीर्ण व्हावे. मातापित्यांचे आशीर्वादाने करिअर करावे. वंजारी समाज हा स्वकर्तृत्वातून पुढे आलेला समाज असून गोपीनाथराव मुंडे, तुकाराम मुंढे यांच्यासारखे रत्न समाजात आदर्श आहेत, असेही ते म्हणाले. मान्यवरांनी मनोगतामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पुढील करिअरसाठी सदिच्छा दिल्या. प्रसंगी आ. किशोर दराडे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी करिअर केल्यानंतर समाजासाठी देणं लागतं. या भावनेने सामाजिक बांधिलकी जोपासली पाहिजे, असे सांगितले. प्रास्ताविक प्रशांत नाईक यांनी केले ,सूत्रसंचालन उमेश वाघ यांनी तर आभार महादू सोनवणे यांनी मानले.

चाळीसगाव तालुक्याचे भरत नागरे, सुनील लोंढे, पाटणादेवी येथील विलास सोनवणे, एरंडोल तालुक्याचे सुरेश सांगळे, रुपेश वंजारी, जामनेर तालुक्याचे किशोर पाटील, बोदवडचे प्रा. वराडे, मुक्ताईनगर तालुक्याचे कैलास वंजारी, दीपक नाईक, देवानंद वंजारी, अंतुर्लीचे वैभव वंजारी, वाकडी येथील ज्ञानेश्वर वंजारी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी वंजारी युवा संघटनेचे अध्यक्ष तथा नगरसेवक प्रशांत नाईक उपाध्यक्ष नामदेव वंजारी, कोषाध्यक्ष योगेश घुगे यांच्यासह चंदुलाल सानप, संतोष घुगे, भानुदास नाईक, उमेश आंधळे, सुधीर नाईक, अनिल घुगे, सचिन ढाकणे, रामेश्वर पाटील, योगेश घुगे,सतोष चाटे आदींनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button