खान्देशजळगांवमहाराष्ट्रशासकीयसामाजिक

दिवाळीत फटाक्यांपासून पाळीव प्राणी, पशुधनाची काळजी घेण्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे आवाहन

पशुधनास त्रास देणाऱ्यांची १०० क्रमांकावर तक्रार द्यावी

*जळगाव,  दिवाळी सण साजरा करतांना पशुधन व पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी. फटाके फोडतांना पशुपक्ष्यांना जाणूनबुजून त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, हेतुपुरस्कर त्रास देणाऱ्या व्यक्तींची माहिती १०० क्रमांकावर पोलीसांना कळवावी. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीचे अध्यक्ष आयुष प्रसाद यांनी केले आहे.

आगामी दिपावली सण साजरा करतांना लहान तसेच मोठया प्राण्यांना कुठलीही इजा होणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी. जनावरांना मारहाण करणे, चटके देणे तसेच पाळीव प्राणी म्हणजे मांजर, कुत्रे व इतर पशुधन यांना फटाक्यांच्या आवाजाने इजा होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी.

हेतुपुरस्करपणे अशा प्रकारच्या त्रास देणाऱ्या व्यक्तींची माहिती पोलीसांना १०० या दूरध्वनी क्रमांकावर कळविण्यात यावी किंवा पशुसंर्वधन विभागाकडे तक्रार नोंदविण्यात यावी. असा गुन्हा करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध प्राणी क्लेश प्रतिबंधक अधिनियम १९६० अंतर्गत फौजदारी कार्यवाही करण्याची तरतूद असून त्यासाठी ३ ते १० वर्षं कैदेच्या शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे असा गुन्हा आपल्याकडून होणार नाही. याची काळजी विशेषत तरुण वर्गाने घ्यावी. असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. प्रसाद व जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.श्यामकांत पाटील यांनी केले आहे.

अशी घ्या पशुधनाची काळजी

प्राण्यांना घरात एकटे सोडू नका.प्राणी फटाक्यांना खूप घाबरतात. त्यामुळे त्यांना फटाक्याजवळ नेणे टाळावे.

त्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने घराच्या खिडक्या उघड्या ठेवण्यावर भर द्यावा.

फटाक्याची राख पाळीव प्राण्यांनी खाल्ल्यास त्यांच्या फुफ्फुसावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे फटाके फोडून झाल्यावर त्या राखेवर पाणी ओता किंवा कुठल्या ना कुठल्या प्रकारे ती राख नष्ट करा.

दिवाळीपूर्वी प्राण्यांना एकदा स्पेशल डॉक्टरकडे दाखवावे, व काही अडचण आल्यास त्यांच्याशी चर्चा करून योग्य औषधोपचार करा.दिवाळीनंतर तुमच्या प्राण्याची तब्येत कशी आहे याकडे लक्ष द्यारज लागल्यास त्यांच्यावर त्वरीत उपचार सुरू करावे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button