जळगावः – गुजरात राज्याची पासिंग असलेली दुचाकी बनावट आरसी बुक व बनावट नंबर प्लेट तयार करून जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथे विक्री करण्यात आली. या दुचाकीला समोरील नंबर प्लेट नसल्याने टॉवर चौक ते जिल्हा परिषद जवळ तपासणी दरम्यान हा प्रकार गुरूवारी २१ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता उघडकीस आला. या प्रकरणी रावेर तालुक्यांतील दोघांविरुद्ध जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी शोयेब कलीम मन्यार (२५, रा. खिरवड, ता. रावेर) याला अटक करण्यात आले आहे.
संतोष खवले व पोकों अमोल ठाकूर हे शहरात पेट्रोलिंग करत असताना त्यांना टॉवर चौक ते जिल्हा परिषदेदरम्यान एका दुचाकीला समोरील नंबर प्लेट नसल्याचे दिसले. त्या वेळी दुचाकीस्वार अब्दुलता. जळगाव) याला थांबवून याविषयी विचारणा केली असता समोरील नंबर प्लेट तुटली असल्याचे त्याने सांगितले. दुचाकीविषयी संशय आल्याने ठाकूर व खवले यांनी दुचाकीला मागे असलेल्या नंबर प्लेटवरून दुचाकीची माहिती तपासली असता ती दुसऱ्याच व्यक्तीच्या नावावर असल्याचे समोर आले. तसेच दुचाकीच्या चेसेस व इंजिन नंबरवरून तपासणी केलीएफएम ८८९५) असल्याचे आढळले. मात्र या दुचाकीवर (एमएच १९, एटी ९०२३) असा क्रमांक होता. त्यावेळी अब्दुल अमीन याने सांगितले की, आपण ही दुचाकी रावेर तालुक्यातील भातखेडा येथील एका जणासह खिरवड येथील शोयेब मन्यार याच्याकडून घेतल्याचे सांगितले.