जळगाव ;- शहरातील बदाम गल्ली भागातील काजल ज्वेलर्सच्या सराफाकडून १६२. १३७ ग्राम वजनाची सोन्याची ९ लाख रुपये किमतीची लगड कारागिराने डाय पाडण्याच्या बहाण्याने घेऊन लंपास केल्याची घटना १० जानेवारी रोजी उघडकीस आली असून याप्रकरणी १९ रोजी शनिपेठ पोलिसांत कारागीराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रतन तारपदा मांझी रा. चोक चायपाट ,ता. दासपूर,जिल्हा मिदिनापूर पश्चिम बंगाल असे आरोपीचे नाव आहे. याबाबत माहिती अशी कि सुभाशीष पंचानंद धारा वय ३३ रा. खाणाकुल, जिल्हा हुगळी हा.मु. बदाम गल्ली ,जुनेजालगाव यांचे काजल ज्वेलर्स नावाने दुकान असून त्यांनी सोन्याची ९ लाख रुपये किमतीची १६२. ३७ ग्राम वजनाची सोन्याची लगड आरोपी रतन मांझी याला डाय पाडण्यासाठी विशवासने दिली असता तो हि लगड घेऊन फरार झाल्याची घटना १० रोजी घडली असून यापर्णी श्री . धारा यांनी शनिपेठ पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिल्यावरून शानिपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे . तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके करीत आहे.