राजकीयजळगांवसामाजिक

मविआचे उमेदवार करण पाटील यांचा प्रचार; नागरिकांकडून ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत

खान्देश टाइम्स न्यूज l २५ एप्रिल २०२४ l पाळधी l महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करणदादा पाटील यांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. बुधवार, दि. २५ रोजी जळगाव ग्रामीण मतदार संघात प्रचाराला सुरुवात करण्यात आली. पाळधी, दोनगाव, रेल, लाडली, चांदसर, कवठळ आदी गावात प्रचार करण्यात आला. सर्वच गावांमध्ये करणदादा पाटील यांना प्रतिसाद लाभून फटाक्यांची आतषबाजी करून स्वागत करण्यात आले.

पाळधी (ता. धरणगाव) येथे मारवाडी गल्ली, गुज्जर वाडा, धनगर वाडा, ६० घर मोहल्लामार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, माळीवाडा यांसह विविध भागात करणदादा पाटील यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. पाळधी खु. च्या माजी सरपंच आशाबाई पाटील यांनी देखील करणदादा पाटील यांचे औक्षण करून स्वागत केले.

दोनगाव येथे प्रगतिशील शेतकरी गंभीर पाटील, माजी सरपंच सुभाष पाटील, रविंद्र पाटील, सरपंच सपना सोनवणे, ग्रा. पं. सदस्य संगीता पाटील, लोटन पाटील, जगदीश पाटील, माजी जि. प. सदस्य रविंद्र पाटील आदी मान्यवरांच्या घरी करणदादा पाटील यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. त्यानंतर निळकंठेश्र्वर महादेव मंदिर येथे करणदादा पाटील यांच्याहस्ते आरती करून नारळ ओवाळण्यात आले. यावेळी करणदादा पवार यांना विजयी करा, अशी प्रार्थना व निर्धार करण्यात आला.रेल, लाडली, चांडसर येथे देखील करणदादा पाटील यांचे फटाके फोडून स्वागत करण्यात आले. याठिकाणी देखील मशाललाच मतदान करू, असा विश्वास ग्रामस्थांनी दिला.

याप्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. व्ही. डी. पाटील, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. व्ही. डी. पाटील, धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा सोनवदचे सरपंच दिलीप धनगर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रघुनाना पाटील, रवींद्र पाटील, रामराव सावंत, माजी जि. प. सदस्य रवींद्र पाटील, ग्रा.पं. सदस्य शकील देशमुख, ऑल इंडिया पँथर सेनाचे तालुकाध्यक्ष सुनील सोनवणे, राष्ट्रवादीचे कार्यालय सचिव संजय चव्हाण, किसान सेलचे जिल्हा सचिव नारायण चौधरी, शेतकरी सेना तालुकाप्रमुख विजय पाटील, सरपंच पती हेमंत पाटील, राजू पाटील, काँग्रेसचे शरीफ पटेल, बशीर शेख, अकील देशमुख, राष्ट्रवादीचे युवक जिल्हा अध्यक्ष उमेश पाटील, धरणगाव तालुकाध्यक्ष धनराज माळी, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष मनोज पाटील, विलास पवार, संतोष सोनवणे, युवासेना तालुकाप्रमुख स्वप्नील परदेशी यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button