खान्देश टाइम्स न्यूज | २२ जुलै २०२४ l जळगाव शहरातील नेरी नाका येथे गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्या दोन जणांना शनिपेठ पोलिसांनी रविवारी २१ जुलै रोजी अटक केली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील नेरी नाका परिसरात संशयित आरोपी गणेश हिमंत कोळी (वय-२३, रा.धानोरा ता. चोपडा जि. जळगाव ह ल.मु. मोहाडी ता. जळगाव ) हा हातात गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची गोपनिय माहिती शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या, त्यानुसार पोउनि चंद्रकांत धनके व सोबत पोकॉ अनिल कांबळे, पोकॉ मुकुंद गंगावणे, पोकॉ विकी इंगळे, पोकॉ रविंद्र साबळे, पोकॉ अमोल वंजारी यांनी कारवाई करत संशयित आरोपी गणेश कोळी याला अटक केली. गावठी कट्ट्याबाबत विचारपुस केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. पोलीसांनी खाक्या दाखवताचा त्याने गुन्ह्याची कबुली दिली. हा गावठी कट्टा मित्र विनय जितेंद्र कोळी याच्याकडे याच्याकडे दिला असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी मोहाडी शिवारातील उमेश पार्क येथील शेतात जाऊन गोठ्यातून गावठी कट्टा जप्त केला आहे शिवाय याला सहकार्य करणाऱ्या विनय जितेंद्र कोळी वय ३४, रा. मोहाडी ता.जि. जळगाव याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी पोकॉ अनिल कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके हे करीत आहेत.