मंत्री असल्यावर देखील करावी लागते तालुक्यात बॅनरबाजी; अमळनेर विधानसभा मतदारसंघात चुरस वाढली
खान्देश टाइम्स न्यूज l १२ जुलै २०२४ l अमळनेर l आज रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार अमळनेर येथे येत असल्याने अमळनेर शहरात अनधिकृत बॅनरबाजी होताना दिसत आहे याचेचं एक उधाहरण म्हणजे अमळनेर धुळे रस्तेलागत कलागुरु मंगल कार्यालयाच्या पुढे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बोर्डावर अनाधिकृत बॅनरबाजी झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे वाहनधारकांना होणारा त्रास आणि दिशादर्शक फलक न दिसल्यामुळे अपघात होण्याची मोठी शक्यता नाकारता येत नाही.
आज १२ रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर जण सन्मान यात्रेच्यां निम्मितांने विशेषतः अमळनेरला भेट देण्यासाठी येणार असून काही आगामी विधानसभा निवडणुकी संदर्भात स्थानिक नेत्यांशी चर्चा करणार आहेत. यावेळी माजी आमदार कृषी भूषण साहेबराव पाटील यांना अजितदादा राखीव वेळ देणार असुन अजितदादांसमोर स्थानिक नेत्यांचे उणे – तुने निघतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
तर स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते व्यक्तिशः मंत्री अनिल पाटील यांच्यावर नाराज आहेत, मागील काही दिवसात बऱ्याच कार्यकर्त्यांनी निव्वळ अंमळनेर तालुक्यात नव्हे तर संपूर्ण जळगाव जिल्ह्यात सामूहिक राजीनामे दिले होते याही विषयाला यावेळी वाचा फुटेल अशी स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बोर्डावर आपले वैयक्तिक बोर्ड लावणे हा निश्चितच गुन्हा आहे. या कृतीमुळे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होते आणि कायद्याचे उल्लंघन ही होतें तर भारतीय दंड संहितेनुसार, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे हा गुन्हा असुन या कृतीला अतिक्रमण म्हणूनही पाहिले जाऊ शकते.तसेच सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचे बोर्ड लावण्यास बंदी असते.
सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्यास भारतीय दंड संहिता कलम ४२७ आणि अतिक्रमण: संहिता कलम ४४१ प्रमाणे संबंधितासं या कृतीतून कायद्याचे उल्लंघन तर होतेच परंतु कायदेशीर कार्यवाहीस ही जावे लागते समोर जर एखाद्या व्यक्तीने अशा प्रकारचा गुन्हा केला असेल तर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल होऊ शकतो आणि त्याला कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागू शकतो. यात दंड, तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.