मोठी बातमी: BHR – भाग्यश्री नवटके यांच्या अडचणीत वाढ, गुन्हा दाखल
खान्देश टाइम्स न्यूज । दि.२८ ऑगस्ट २०२४ । काही वर्षांपूर्वी आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटके यांनी जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याने त्या अडचणीत सापडल्या होत्या. वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांची बीडवरून छत्रपती संभाजीनगरला बदली झाली होती. दरम्यान, त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या असून भाईचंद हिराचंद रायसोनी (BHR) प्रकरणी नवटके यांच्याविरोधात पुणे बंडगार्डन पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आयपीएस भाग्यश्री नवटके पुन्हा एकदा वादात सापडल्या आहेत. आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटके यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यामुळे आयपीएस भाग्यश्री नवटाके यांच्या अडचणी वाढल्या आहेत. गृह विभागाच्या आदेशानंतर पुणे पोलिसांनी नवटके यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. बीएचआर या पतसंस्थेने ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यात २०२१ मध्ये गुन्हा दाखल होता. या प्रकरणात त्यांनी विनाकारण तीन गुन्हे नोंदवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. नवटके या त्यावेळी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत होत्या.