
लहान मुलास दमदाटी करून गळा दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा
तहसील कार्यालय जवळील प्रकाराने खळबळ
जळगाव प्रतिनिधी
रिक्षामध्ये बसलेल्या एका अज्ञात विकृत मानसिकतेच्या व्यक्तीने रिक्षा चालकाच्या लहानग्या मुलाला दमदाटी देऊन त्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक प्रकार तहसील कार्यालयाजवळ 26 रोजी दुपारी पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून रिक्षा चालकाने आरडाओरड केल्यामुळे जमावाने अज्ञात व्यक्तीला चोप दिला. मात्र ती व्यक्ती रिक्षा चालकाला तुला बघून घेईल अशी धमकी देऊन त्याने पोबारा केला. त्याबाबत रिक्षाचालक पित्याने त्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानुसार अदाखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकाराने भेदरलेल्या चिमुकल्याला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, तसेच यावेळी त्याच्या गळ्याला सूज आल्याने त्याला उलट्यांचा त्रास होत होता. सामाजिक कार्यकर्ते फारूक कादरी यांनी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या प्रकार हा निदर्शनास आणून दिला असून त्यांनी संशयित व्यक्तीचा शोध घेऊन कारवाई करण्याचा व्यक्त केला. तसेच त्यांनी चिमुकल्यासह त्याच्या कुटुंबीयांची विचारपूस केली,
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा येथील व्यवसायाने रिक्षा चालक असलेले इस्माईल इब्राहिम मुजावर वय 28 हे त्यांचा मुलगा मुस्तकीम याच्यासोबत रिक्षाने तहसील कार्यालयाजवळ आले असता त्यांच्या रिक्षात बसलेल्या एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या लहान मुलगा मुस्तकीम याला जवळ घेऊन त्याला दमदाटी करून त्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. ही बाब रिक्षा चालक असलेल्या मुजावर यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याचा जाब विचारून त्यांनी आरडाओरड केल्याने या ठिकाणी बरेच लोक जमा झाल्याने त्यांनी त्या अज्ञात व्यक्तीला बेदम चोप दिला. मात्र ती अज्ञात व्यक्ती रिक्षाचालक मुजावर यांना बघून घेईल अशी धमकी देऊन निघून गेला. या घटनेनंतर लहानगा मुस्तकीम हा भेदरलेल्या अवस्थेत होता. यावेळी त्याच्या गळ्याला सूज आल्याचे प्रत्यक्ष दर्शनी सांगितले. दरम्यान याबाबत इस्माईल मुजावर यांनी दिलेल्या खबरीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध एन सी आर दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे. दरम्यान अज्ञात व्यक्तीच्या या कृत्यामुळे खळबळ उडाली. पोलिसांनी अशा विकृत मानसिकतेच्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.