खान्देशजळगांवशासकीय

महायुतीत धुसफूस उघड! भाजप उमेदवाराच्या अर्जावेळी शिवसेनेची दांडी; नगरसेविकेची बंडखोरी चर्चेत

महायुतीत धुसफूस उघड! भाजप उमेदवाराच्या अर्जावेळी शिवसेनेची दांडी; नगरसेविकेची बंडखोरी चर्चेत

चार आमदार गैरहजर, प्रमुख पदाधिकाऱ्यांनी फिरवली पाठ; रेश्मा काळे यांचा अपक्ष अर्ज, जळगाव विधानपरिषद निवडणुकीत रंगत वाढली

जळगाव | प्रतिनिधी

जळगाव विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत नाराजी आता उघडपणे समोर येऊ लागली आहे. जागावाटपात जळगावची जागा भाजपच्या वाट्याला गेल्यानंतर निर्माण झालेला असंतोष उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशीच स्पष्टपणे दिसून आला. भाजपचे उमेदवार यांच्या उमेदवारी अर्ज दाखल कार्यक्रमाकडे शिवसेनेच्या चार आमदारांसह अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

महायुतीत या जागेसाठी भाजप आणि दोन्ही पक्ष आग्रही होते. शिवसेनेकडून पालकमंत्री यांचे पुत्र प्रताप पाटील यांचे नाव पुढे आले होते. मात्र अंतिम जागावाटपात भाजपने ही जागा आपल्या पदरात पाडत नंदू महाजन यांना उमेदवारी दिली. त्यामुळे शिवसेनेत नाराजीची भावना निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे.

विशेष म्हणजे, उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित असताना शिवसेनेच्या अनेक प्रमुख नेत्यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. त्यामुळे महायुतीतील समन्वय आणि एकजूट याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दुसरीकडे भाजपमध्येही उमेदवारीवरून अंतर्गत चर्चा रंगल्या आहेत. सुरुवातीला डॉ. केतकी पाटील यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा असताना ऐनवेळी नंदू महाजन यांच्या नावाची घोषणा झाल्याने पक्षातील काही मतप्रवाह समोर आल्याचे बोलले जात आहे.

या सर्व घडामोडींमध्ये आणखी एक नाट्यमय वळण म्हणजे शिवसेनेच्या नगरसेविका यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महायुतीच्या अधिकृत उमेदवाराविरोधात रिंगणात उतरत त्यांनी राजकीय वातावरण अधिकच तापवले आहे. महिला आघाडीचा पाठिंबा असल्याचा दावा करत आपण शेवटपर्यंत निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, निवडणूक प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी जळगावात दाखल झाले असून, पुढील काही दिवसांत राजकीय हालचालींना अधिक वेग येण्याची चिन्हे आहेत.

१५ वर्षांनंतर जळगाव विधानपरिषद निवडणूक इतक्या रंगतदार आणि बहुरंगी स्वरूपात होत असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आता या राजकीय लढतीकडे लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button