राजकीयजळगांव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

जळगाव तालुक्यातील शिवसेना कार्यकर्ता मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद 

खान्देश टाइम्स न्यूज l १३ सप्टेंबर २०२४ l जळगाव l पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आसोदा, देवूळवाडा, पथरी, घार्डी आणि ममुराबाद येथील शेकडो तरुणांनी आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेनेत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वागत केले. दरम्यान, जळगावातील आदित्य लॉन येथे पार पडलेल्या मेळाव्याला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता.

जळगावातील आदित्य लॉन येथे शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व इतर आघाडीची आज विस्तृत बैठक पार पडली. यावेळी आसोदा, देवूळवाडा, पथरी, घार्डी आणि ममुराबाद येथील शेकडो तरुणांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थिती शिवसेनेत प्रवेश केला आहे.

या तरुणांनी केला शिवसेनेत प्रवेश !
असोदा येथील दिनकर भिल, मंगल भिल, कैलास भिल, किशोर गायकवाड, सागर भिल, नंदू भिल, सोनू भिल, दिनेश भिल, छोटू भिल, सोनू भिल, विशाल भिल, रवींद्र भिल, योगेश भिल, जितेंद्र भिल, सुनिल भिल, तानाजी भिल, शंकर भिल, ब्रम्हा भिल, अरुण मरसाळे, भुरा मरसाळे, दीपक मरसाळे, नरेंद्र मरसाळे, योगेश मरसाळे, अनिल पवार, संतोष चंदनशिवे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

देवूळवाडा येथील पवनदास सोनवणे, मनिक सोनवणे, दिवाकर सोनवणे, मोतीलाल सोनवणे, लीलाधर सोनवणे, गणेश सोनवणे, अनिल सोनवणे, मिथुन सोनवणे, नरेंद्र साळुंखे यांनी प्रवेश केला.

पाथरी येथील योगेश बाविस्कर, रोशन जाधव, सागर पाटील यांनी प्रवेश केला. तर घार्डी येथील ज्ञानेश्र्वर कोळी, ज्ञानेश्र्वर संतोष कोळी, सोपान कोळी, समाधान कोळी, परमेश्वर कोळी यांनी प्रवेश केला.

ममुराबाद येथील अनिस पटेल, शेनबिर बशीर, इमरान पटेल, जावेद पटेल, अल्ताफ पटेल, रसुल, शाकीर पटेल, यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वागत केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button