जळगाव l १४ ऑगस्ट २०२४ l पाणी पुरवठा व स्वच्छता तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम.
गुरुवार दि १५ ऑगस्ट, २०२४ रोजी सकाळी ८.१० वाजता पाळधी ता. धरणगाव येथून शासकीय वाहनाने अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव कडे प्रयाण, सकाळी ८.३० वाजता अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व राखीव, सकाळी ८.५५ वाजता अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथून जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव कडे प्रयाण, सकाळी ९.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे आगमन, सकाळी ९.०५ वाजता पालकमंत्री यांच्या हस्ते ध्वजारोहण व राट्रगीत, सकाळी ९.१५ ते ९.२५ वाजता शुभ स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हावासियांना संदेश.
सकाळी ९.२५ ते ९.४५ वाजता विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार समारंभ, नितीन ईश्वर मोरे युनीट १०, महार रेजिमेंटमध्ये कार्यरत असताना सैन्यदलाकडून कांगो या देशात संयुक्त राष्ट्र मिशन, (मोनुस्को) या मोहिमेमध्ये डोक्याला दुखापत झाल्याने ७६ % अपंगत्व आले त्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनामार्फत त्यांना ताम्रपट देवून सन्मान.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी व पूर्व माध्यमिक परीक्षा इयत्ता ८ वी फेब्रुवारी, २०२४ मध्ये राज्य गुणवत्ता यादीतील एकूण ३ विद्यार्थ्यांचा गौरव, कृषी विभागा मार्फत आयोजित पिक स्पर्धेतील शेतकरी यांचा सन्मान.
सकाळी ९.४५ ते १० वाजता स्वातंत्रय सैनिक व नागरिकांची सदिच्छा भेट, सकाळी १० ते १०.१० वाजता चहापान, सकाळी १०.१० ते ११.३० वाजता राखीव, सकाळी ११.३० ते १ वाजता महसूल पंधरवडा सांगता समारंभास नियोजन भवन येथे उपस्थिती, सोयीनुसार – अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे प्रयाण व राखीव, सोयीनुसार – अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथून पाळधी ता. धरणगाव कडे प्रयाण व राखीव.