खान्देश टाइम्स न्यूज l जळगाव l ०७ ऑक्टोबर २०२४ l जिल्ह्यातील पारोळा व भडगाव येथील दाखल दुचाकी चोरीच्या गुन्ह्यामध्ये तपासात एलसीबीला यश मिळाले आहे. याप्रकरणी दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. यातील ४ दुचाकी या पुणे व मुंबई येथून चोरी झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
जिल्ह्यामध्ये दुचाकी चोरींचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी एलसीबीला तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने गोपनीय माहिती काढून चोरीच्या दुचाकी दोन संशयित घेऊन फिरत असल्याचे कळाले. (केपी)त्यावरून पारोळा येथील रहिवासी रवींद्र उर्फ राहुल पाटील (वय २१) आणि दीपक ज्ञानेश्वर पाटील (वय २५) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ६ दुचाकी एकूण १ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहेत.
यातील एक दुचाकी पारोळा पोलीस स्टेशन, दुसरी भडगाव आणि इतर ४ या पुणे व मुंबई येथून चोरी केल्याचे दोघं संशयित आरोपींनी सांगितल्याने त्याबाबत तपास सुरू आहे. सदरची कारवाई ही एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार विजयसिंह पाटील, सुधाकर अंभोरे, महेश महाजन, अक्रम शेख, लक्ष्मण पाटील, राहुल पाटील, जितेंद्र पाटील, भूषण पाटील, रणजीत जाधव, दीपक चौधरी आदींनी केली आहे.