जळगाव :-एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका हॉटेलमध्ये वेश्या ववसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी या ठिकाणी छापा मारला असता सहा महिलांची सुटका करून दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार एमआयडीसी एरियातील सेक्टर जी मध्ये असणाऱ्या सागर नावाच्या लॉजवर वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार या ठिकाणी एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने सोमवारी छापा टाकून सहा महिलांसह दोन जणांना ताब्यात घेतले.
याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.