
खान्देश टाइम्स न्यूज l जळगाव l वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात उत्तमरीत्या कार्यरत असलेल्या डॉक्टर्स व सामाजिक कार्यकर्त्यांच्या चांगल्या कार्याची नोंद घेत त्यांचे कौतुक करून प्रोत्साहन देण्यासाठी सारांश फाऊंडेशन तर्फे रविवार दिनांक ६ ऑगस्ट २०२४ रोजी शिक्षण शास्त्र महाविद्यालय येथील येथे समाजभूषण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून जळगाव जिल्हा आयएमए असोसिएशनच्या सचिव डॉ अनिता भोळे, माजी महापौर जयश्री महाजन, जळगाव महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकूंद सपकाळे, माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे यांच्यासह सारांश फाउंडेशनच्या अध्यक्षा निलू इंगळे यांची उपस्थिती होती. सर्व प्रमुख अतिथींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलू इंगळे यांनी केले, तर सूत्रसंचालन हरिश्चंद्र सोनवणे व आभार प्रदर्शन सोनली पवार यांनी केले.
वैद्यकीय क्षेत्रातील कार्यासाठी सत्कारार्थी डॉ लीना पाटील, डॉ कोमल सरोदे, डॉ मोना बोरोले, डॉ वृषाली पाटील, डॉ कविता आडिया, डॉ आनंद दशपुत्रे, डॉ विकास पाटिल, डॉ उमेश वानखेडे, डॉ सुषमा चौधरी, आर एल हॉस्पिटल, डॉ अनिल शिरसाळे, डॉ दिपक चौधरी तसेच सामाजिक क्षेत्रातील कार्यासाठी निवेदिता ताठे, कविता झाल्टे, वैशाली पाटील, माजी नगरसेविका पार्वता भिल, शुभांगी बिऱ्हाडे, कुसुमताई फाउंडेशन, सिद्धिविनायक पार्क महिला मंडळ यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. आधार बहुद्देशीय संस्थेच्या प्रकल्प समन्वयक
निवेदिता ताठे यांनी एक्सेस टू जस्टीस अभियानाअंतर्गत उपस्थित सर्वांना बालविवाह मुक्त भारत होण्यासाठी शपथ घ्यायला लावली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सारांश फाऊंडेशनच्या उपाध्यक्ष इंदू मोरे, सचिव चंदा इंगळे, विद्या झनके, रंजना मोरे, संगीता पगारे, संजय इंगळे, आशा खैरनार, संगीता मोरे, पूजा इंगळे, अजय इंगळे यांनी परिश्रम घेतले.