जळगाव ;- तालुक्यातील शिरसोली येथील माहेर असलेल्या विवाहितेचा २ लाखांच्या मागणीसाठी छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या चार जणांविरोधात गुरुवारी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.
जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील माहेर असलेल्या जान्हवी राजेंद्र जाधव यांचा चाळीसगाव तालुक्यातील टाकळी येथील राजेंद्र रामदास जाधव यांच्याशी झाला आहे. ९ जुलै २०२१ ते १० जुलै २०२२ या दरम्यान काळात नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी जान्हवी हिने तिच्या माहेरुन दोन लाख रुपये आणावेत अशी मागणी तिचे पती राजेंद्र जाधव यांच्यासह सासरच्या मंडळींनी केली, तसेच याच कारणावरुन जान्हवी तिला वेळोवेळी मारहाण करत तिचा शारिरीक व मानसिक छळ केला. छळाला कंटाळून जान्हवी ह्या माहेरी निघून आल्या. व त्यांनी गुरुवार, १३ जुलै २०२३ रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली, या तक्रारीवरुन जान्हवी हिचे पती राजेंद्र रामदास जाधव, सासरे रामदास यादव जाधव, सासू अल्काबाई रामदास जाधव, व शालिक रामदास जाधव सर्व रा. टाकळी ता. चाळीसगाव या चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक समाधान टहाकळे हे करीत आहेत.