खान्देश टाइम्स न्यूज l जळगाव l IUF इंटरनॅशनल युनानी फोरम कडून ०७ ऑक्टोबर २०२४ रोजी इंटरनॅशनल ऑनलाईन क्युज कॉम्पटीशन घेण्यात आले होते त्या मध्ये १३ देशातुन १५५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्या १३ देशांच्या विद्यार्थ्या मधुन इकरा युनानी महाविद्यालयाच्या ६ विद्यार्थी व विद्यार्थींनी टॉप टेन मध्ये विषेश प्राविण्य प्राप्त केले आहे. त्या विद्यार्थ्यांचे आज दिनांक १७ ऑक्टोबर २०२४ रोजी महाविद्यालया कडून सत्कार समारंभाचे कार्यक्रम आयोजीत करण्यात आले. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष इकरा एज्युकेशन सोसायटीचे डॉ. अब्दुल करीम सालार होते. तसेच इकरा एज्युकेशन सोसायटीचे सदस्य प्रोफेसर जफ़र शेख, अ. रशिद शेख, गुलाम नबी बागवान, अब्दुल अजिज सालार व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मो. अब्दुल कुद्दुस, उप-प्राचार्य डॉ. शोएब शेख, डॉ. इकबाल शेख, डॉ. नसिम अन्सारी, डॉ. अनीस शेख, डॉ. समीना खान, डॉ. सुमैय्या शेख उपस्थित होते.
या कार्यक्रमात विषेश प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थी द्वितिय क्रमांक सय्यद अरविश, तृतीय क्रामांक शेख हुमेरा, चौथा क्रमांक खान अदनान, पाचवा क्रमांक कामरान फैसल, सहवा क्रमांक मिर्जा उवैस, नऊवा क्रमांक खान लुईजा यांचे इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.अब्दुल करीम सालार व सदस्य यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचे सत्कार करण्यात आले व सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.