जळगाव ;- जामनेर तालुक्यातील एका महिला व्यापार्याची क्रेडिट कार्ड प्लान बंद कारून देतो असे सांगून एका अज्ञात व्यक्तीने १ लाख १३ ६६४ रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार ६ फेब्रुवारी रोजी घडला असून महिलेच्या फिर्यादीवरून पहूर पोलीस स्टेशनला एकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी कि, जामनेर तालुक्यातील देऊळ गाव गुजरी येथे कापड व्यासायिक सीमा कमलेश जैस्वाल यांना ६ रोजी एका मोबाईल क्रमांकावरून अज्ञात व्याक्तीचा फोन आला. त्याने एसबीआय क्रेडिट कार्ड कार्यालयातून बोलत असून तुमचे क्रेडिट कार्ड प्लॅन बंद करून देतो असे सांगून सीमा जैस्वाल यांच्या गुगल पे अकाऊंटमधून १ लाख १३ हजार ६६४ रुपये ऑनलाईन ट्रॅन्जेक्शन करून फसवणूक केल्याचा प्रकार सायंकाळी पावणे पाच ते ६ वाजेदरम्यान घडला. याप्रकरणी सीमा जैस्वाल यांच्या फिर्यादीवरून ९ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुंमारास अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक सचिन सानप करीत आहे.