
जळगाव | प्रतिनिधी जळगाव जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागात मोठी खळबळ उडवणारी घटना गुरुवारी उघडकीस आली. अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयवंत मोरे यांना १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने रंगेहाथ अटक केली.
तक्रारदाराच्या शासकीय कामाच्या मोबदल्यात डॉ. मोरे यांनी ३० हजार रुपयांची लाच मागितली होती. या तक्रारीची ACB मार्फत पडताळणी करण्यात आली. त्यानंतर गुरुवारी दुपारी ३.३० ते ४ वाजेच्या सुमारास जळगाव येथील जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात सापळा रचण्यात आला. या सापळ्यात डॉ. मोरे १५ हजार रुपयांची तडजोडीची रक्कम स्वीकारताना अडकले.
या कारवाईमुळे आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली असून, कार्यालयात सायंकाळी शुकशुकाट पाहायला मिळाला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुढील तपास सुरू केला असून, संबंधित प्रकरणी काही अधिकारी व अधिनस्त कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू आहे.
ही कारवाई जळगाव ACBचे DYSP योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली