जळगाव रेल्वे स्थानकावरील प्रकार
जळगाव ;- जळगाव रेल्वेस्थानकाच्या फलाटावर एक मालगाडी थांबली असता अज्ञात ५० वर्षीय माथेफिरू या डब्यावर चढला असता त्याला हाय व्होल्टेजचा विद्युत शॉक लागून त्याचा मृत्यू ओढविल्याची घटना शुक्रवार १४ जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून हा प्रकार रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शुक्रवार १४ जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास जळगाव रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक ४ वर एक मालगाडी उभी असतांना एक अनोळखी व्याक्तिने मालगाडीच्या डब्यावर चढला असता त्याचा विद्युत तराणा स्पर्श झाल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना घडली . याचे चित्रण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून त्याची ओळख पटविण्याचे आवाहन करण्यात आले असून या घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.