केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा चाळीसगाव येथील जाहीर सभेत विरोधकांवर हल्लाबोल..
खान्देश टाइम्स न्यूज l प्रतिनिधी l विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एरंडोल , पारोळा , भडगाव , पाचोरा , चाळीसगाव येथील महायुतीच्या उमेदवारांकरिता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा आयोजित केली होती.
त्या अनुषंगाने हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या जनसमुदायास संबोधन करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी चाळीसगाव येथील सभेत विरोधकांवर हल्लाबोल केला. आपल्या भाषणात त्यांनी सुरुवात करताना पद्मालय येथील गणेश मंदिर , पाटणादेवी येथील चंडिका देवी मातेला नमन करून आपल्या भाषणाची सुरुवात केली. मागील महाविकास आघाडीच्या सरकारने बंद केलेले विकास कामे सुरू करून महायुतीच्या सरकारने “सबका साथ सबका विकास”हे ध्येय असलेल्याने पुन्हा जोमाने विकास कामाचे सुरुवात केली. राहुल गांधी हे आपल्या भाषणात सर्वांना संविधानाची प्रत दाखवत फिरत आहेत परंतु त्या संविधानाचे वाचन त्यांनी केले आहे किंवा नाही हे मला माहीत नाही असं म्हणाले. हरियाणाच्या निवडणुकीत जसा विरोधकांचा टाय टाय फिस केला त्याचीच पुनरावृत्ती झारखंड व महाराष्ट्रात सुद्धा होईल व जनता त्यांना त्यांची जागा दाखवत असा विश्वास व्यक्त केला. महाविकास आघाडी खोटे आश्वासन देऊन जनतेची फसवणूक करीत असते तसे काम महायुतीचे सरकार करीत नसून त्याचा प्रत्यय चाळीसगाव पाचोरा एरंडोल पारोळा भडगाव येथील जनतेने अनुभवले असून तसेच विकासाची गंगा पुढे सुरू व्हावी म्हणून आ. मंगेश चव्हाण , आ. किशोर पाटील , एरंडोल पारोळा भडगाव येथे विकासाचे गंगा आणणारे आ. चिमणराव पाटील यांच्या सुपुत्र अमोल चिमणराव पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन केले. महाराष्ट्र महायुती सरकार लाडकी बहीण योजना, महिलांना एसटी प्रवासात निम्मे टिकीट , 75 वर्षावरील वयोवृद्धांना मोफत प्रवास या योजनेचा अनेक जण लाभ घेत असून त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेतून महायुतीच्या सरकार पुन्हा निवडून येईल याचा प्रत्यय २३ तारखेच्या निकालात उत्तर महाराष्ट्राची जनता दाखवून देईल.
याप्रसंगी महायुतीचे आ. गिरीश महाजन , महायुतीच्या जळगावच्या खा. स्मिताताई पाटील , आ. मंगेश चव्हाण , आ. किशोर पाटील , आ. चिमणराव पाटील , महायुतीचे उमेदवार अमोल पाटील , महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.