चोपडा तालुक्यातील मध्य प्रदेश सीमेलगतची घटना
चोपडा -चारित्र्याच्या संशयावरून 19 वर्षीय पत्नीला जिवे ठार मारण्याचे उद्देशाने कुऱ्हाडीचे घाव घालून तिला गंभीर जखमी केले तर दोन लहान चिमुकल्यांना कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे
. संजय नाना सिंग पावरा वय 23 असे या आरोपीचे नाव असून तो आपल्या 19 वर्षे पत्नीसह गौऱ्या पाडा येथे वास्तव्याला होता. 18 नोव्हेंबर रोजी त्याचे पत्नीसोबत जोरदार भांडण झाल्याने ती आपल्या मुलांना घेऊन मध्य प्रदेश मधील देवली येथे निघून गेली होती. मात्र काही दिवसानंतर संजय हा देवळी येथे पत्नी कडे गेला असता तिथे पुन्हा त्याचे जोरदार भांडण होऊन त्याने संतापात मुलगा डेव्हिड वय 5 आणि मुलगी डिंपल वय तीन या दोघांवर कुऱ्हाडीने वार करून त्यांना जागीच ठार केले. तर पत्नी वर देखील त्याने वार केले. मात्र पत्नी ही बचावली असून ती गंभीर जखमी झाली आहे. गावातील लोकांनी आरोपी संजय याला मध्य प्रदेशातील वरला पोलीस ठाण्यात जमा केले असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान संजयच्या पत्नीला गंभीर असल्याने धुळे ते शासकीय वैद्यकीय रुग्णालयांमध्ये तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आले असून तिची प्रकृती नाजूक असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान या घटनेमुळे चोपडा तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे.