जळगावातील बिबा नगर येथील घटना
जळगाव प्रतिनिधी:-गिरणा नदी पात्रातून अवैधरित्या होणारी वाळू वाहतूक रोखण्यासाठी तहसीलदारांचे वाहन हे गस्तीवर असताना एका वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरने धडक दिल्याचे घटना आज सकाळी उघडकीस आली असून यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान या घटनेत कोणालाही इजा झाली नाही. याप्रकरणी वाळूचे भरलेले ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, नदीपात्रात मध्ये होणारी अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभागाकडून ठीक ठिकाणी गस्त घालून अशी अवैध वाळू वाहतूक रोखण्याचे काम केले जाते. नेहमीप्रमाणे आज चार ते पाच तलाठी यांचे पथकाने बिबा नगर परिसरात अवैधरित्या वाळूचे भरलेले ट्रॅक्टर पकडले.
मात्र हे ट्रॅक्टर जमा करण्यासाठी नेत असताना ट्रॅक्टर चालकाने हे वाहन पळून घेऊन जात त्याने तहसीलदार यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. या धडकेत सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. दरम्यान वाळूने भरलेले ट्रॅक्टर हे जप्त करण्यात आले आहे.