खान्देशगुन्हेजळगांव

भडगाव तालुक्यात अवैध वाळू वाहणारे ट्रॅक्टर जप्त

भडगाव : तालुक्यतील टोणगाव तसेच वाक येथून अवैध वाळूवाहतूक करणारे ट्रॅक्टर महसूल विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी ट्रॅक्टर मालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

भडगाव शहरासह तालुक्यात गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक सुरुच आहे. यावर भडगाव महसूल विभागाच्या वेगवेगळ्या पथकांनी गेल्या दोन दिवसापूर्वी मोठी कारवाई करुन अनेक वाहने जप्त केली आहेत. यातच महसूल विभागाने काल रात्री टोणगाव येथून एक ट्रॅक्टर तर वाक येथून अवैध वाळू भरलेले एक ट्रॅक्टर जप्त केले आहे. या ट्रॅक्टर मालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती महसूल विभागाने दिली आहे.

दरम्यान, या दोन्ही कारवाई पथकात ग्राम महसूल अधिकारी संजय सोनवणे, लोकेश महाजन, विजय पाटील, कोतवाल समाधान माळी, तलाठी हलकारे, विलास शिंदे यांचा समावेश असून त्यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button