पारोळा (प्रतिनिधी). ;- समोरून येणाऱ्या भरधाव कारणे दुसऱ्या कारला जोरदार धडक देऊन झालेल्या भीषण अपघातात दांपत्य ठार झाल्याची घटना आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास म्हसवे गावाजवळीत राष्ट्रीय महामार्गावर घडली. सुधीर देविदास पाटील वय 48 आणि त्यांची पत्नी ज्योती सुधीर पाटील वय 44 दोन्ही. रां.लोणी तालुका पारोळा हल्ली मुक्काम गुजरात असे ठार झालेल्या दांपत्याची नावे आहेत
.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की गुजरात येथील रहिवासी असलेले पाटील दांपत्य हे आपल्या मूळ गावी लोणी येथे जाण्यासाठी लग्न असल्याने आले असता आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास म्हसवे गावा नजीक असलेल्या फाट्याजवळ सुधीर पाटील यांची कार क्रमांक (०५-आर एच १२४७) ने लोणी गावी जात असताना वळणावर जळगाव कडून धुळ्याकडे जाणारी भरधाव ऑडी कार क्रमांक डी डी ०३-६९०३ ने जोरदार धडक दिल्याने या झालेल्या भीषण अपघातात सुधीर पाटील आणि ज्योती पाटील हे दोघे पती-पत्नी जागीच ठार झाले. तसेच दुसऱ्या कारमधील जखमींना तातडीने एरंडोल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून याबाबत पोलिसात उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरू होते.