जळगाव :- राष्ट्रीय महामार्गावरील साकेगाव जवळ पायी चालणाऱ्या एका तरुणाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो ठार झाल्याचे घटना एक डिसेंबर रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली असून याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान मयत तरुणाची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील एका पेट्रोलपंपासमोर राष्ट्रीय महामार्गावर रविवार दि. १ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता एक तरुण पायी जात होता. त्या वेळी त्याला भरधाव अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. त्याला खासगी वाहनाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. मयताची ओळख पटविण्याचे आवाहन जिल्हा पेठ पोलिसांनी केले आहे.