खान्देशगुन्हेजळगांव

पोलिस कर्मचाऱ्याची हत्या करणाऱ्यांना अटक करण्याबाबत निवेदन

पाचोरा ;- मुंबई पोलिस मध्ये कार्यरत असलेला शुभम अनिल आगोणे यांची १४ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या दरम्यान पाटणादेवी रोड, बामोशी बाबा दर्गा समोर क्रिकेटच्या कारणावरून चाळीसगांव येथील सराईत गुन्हेगारांनी तिक्ष्ण तलवारी व चॉपरच्या सहाय्याने हत्या केली. पोलीस कर्मचाऱ्यावर गावगुंडाकडून असा हल्ला होत असेल तर सामान्य जनतेने कोणाकडे दाद मागावी ? असा प्रश्न सामान्यांना पडलेला आहे.

भर दिवसा तलवारी काढून एका पोलीसावर हल्ला करण्याची हिम्मत सराईत गुन्हेगार करतात, त्यामुळे या राज्यातील कायदा व सुव्यवस्था पणाला लागल्याचे चित्र सर्व सामान्यांसमोर निर्माण झाले आहे. त्यामुळे या सराईत गुन्हेगारांना वेळीच पायबंद घातला नाही तर दिवसा ढवळ्या सामान्य जनतेचे हाल होतील. शुभम आगोणे यांना मारुन फरार झालेल्या आरोपींना तात्काळ अटक करा अशा मागणीचे निवेदन पोलिस बाॅईजतर्फे उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय येरुळे यांना देण्यात आले. यावेळी हर्षल पाटील, नदीम शकील शेख, बंटी पाटील, प्रफुल पाटील, हर्षल पाटील यांचेसह पोलीस बॉईज उपस्थित होते.

फरार आरोपींना त्वरीत अटक करण्यात यावी, सदरील आरोपींची केस जलद न्यायालयात चालविण्यात यावी, सदरील केस चालविण्यासाठी सक्षम सरकारी वकिल नेमण्यात यावा, सदरील आरोपी हे परंपरागत सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी, सदर आरोपींची येरवडा कारागृहात रवानगी करावी, सदरील आरोपी हे परंपरागत समाज विघातक प्रवृत्तीचे असून व सराईत गुन्हेगार असून यांना सदरील खटल्यामध्ये फाशीची शिक्षा व्हावी. अशा आषयाचे निवेदन उपविभागीय पोलिस अधिकारी यांना देण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button