जळगाव : शहरातील ज्या नागरिकांनी मालमत्ता कराची रक्कम भरली नसेल अशा थकबाकीदारांची मालमत्ता जप्तीची कारवाई पुढील आठवड्यापासून केली जाणार असल्याचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी निर्देश दिले असून याबाबत दोन रोजी प्रभाग समिती एक ते चार च्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या आढावा बैठकीत त्यांनी वसुलीच्या सूचना केल्या.
थकबाकी न भरणाऱ्या मालमत्ता धारकांच्या नळ कनेक्शन तोडण्याचे काम करण्यात आले असून आता आणखी थकबाकी न भरणाऱ्या मालमत्ता धारकांच्या मालमत्ता जप्तीची कारवाई करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
प्रभाग समिती क्रमांक १ अंतर्गत आतापर्यंत २० नळ संयोजन बंद करण्यात आले असून १२ लाख ६५००० हजार रुपयांची वसुली झाली आहे. तर प्रभाग समिती क्रमांक २ अंतर्गत ५ लाख ९० हजार ९६१ रुपयांची वसुली झाली आहे. तसेच प्रभाग समिती क्रमांक ३ अंतर्गत ५ नळ संयोजन बंद करण्यात आले असून ३ लाख, ४७ हजार २६८ रुपयांची वसुली झाली आहे. तर, प्रभाग समिती ४ अंतर्गत १५ थकबाकीदारांचे नळ कनेक्शन कट करण्यात आले असून २ लाख ६८ हजार २९७ रुपयांची वसुली झाली आहे. चारही प्रभाग समिती अंतर्गंत ४० थकबाकीदारांचे नळ कनेक्शन कट करण्यात आले असून करापोटी २४ लाख ७१ हजार ६२६ रुपयांची वसुली करण्यात आली आहे.