जळगाव ;- शहरातील वाघ नगर येथे बंद असलेले घर हेरून अज्ञात चोरट्यांनी सोने-चांदीच्या दागिनेसह मुद्देमालावर डल्ला मारून दोन लाख 62 हजार रुपयांचा हेवत चोरून नेल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,
शहरातील वाघ नगर परिसरातील जिजाऊ नगर परिसरात डॉ. दिप्तांशू पाटील हे पत्नी व मुलासह राहतात तर त्यांचे आई-वडील पुणे येथे राहतात. त्यांची आजी आजारी असल्याने त्यांना पाहण्यासाठी डॉ. दिप्तांशू हे सहपरिवार दि. ४ डिसेंबर रोजी पुणे येथे गेले. त्यानंतर दि. ६ डिसेंबर रोजी पहाटे अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. त्या वेळी कपाटात ठेवलेले १३४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व चांदीची देवीची मूर्ती असा एकूण दोन लाख ६२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला.
घरफोडी झाली त्या वेळी शेजारच्यांना पाटील यांच्या घराजवळ काहीतरी हालचाल सुरू असल्याने संशय आला. त्यावेळी डॉक्टरांच्या घराकडे बघितले असता, त्यांना घरातून जाताना एक जण दिसला. शेजारील मंडळींनी पाहणी केली असता आतील दरवाजा उघडा व लोखंडी ग्रीलचा दरवाडा ओढलेला होता.
शेजारच्यांनी दिली घरफोडीची माहिती शेजाऱ्यांनी त्यांच्या घरात चोरी झाल्याची माहिी डॉ. पाटील यांना दिली. माहितीमिळताच ते जळगावात परतले व त्यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सपोनि अनंत अहिरे करीत आहेत.
घटनास्थळी श्वान पथकही बोलविण्यात आले. काही अंतरापर्यंत त्याने माग काढला. तसेच सीसीटीव्हीमध्ये दोन जण दुचाकीवरून जात असल्याचे दिसत आहे. पोलिस त्यादृष्टीने त्यांचा शोध घेण्यासह रेकॉर्डवरील चोरट्यांचीही चौकशी केली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली