खान्देशगुन्हेजळगांव

फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

जळगाव : माझ्यासोबत प्रेमसंबंध नाही ठेवले, तर सोबत

काढलेले फोटो आणि व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. ही घटना दि. ४ डिसेंबर रोजी घडली. याप्रकरणी कामेश उर्फ कमलेश विनोद चरखे (रा. विठ्ठल मंदिराजवळ, सुप्रिम कॉलनी) या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सतरा वर्षीय मुलगी वास्तव्यास आहे. दि. ४ डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास संशयित कामेश उर्फ कमलेश चरखे याने हात ओढून धमकी दिली. यावेळी त्याने तू माझ्यासोबत प्रेमसंबंध नाही ठेवले तर मी तुझ्यासोबत काढलेले फोटो आणि व्हीडीओ व्हायरल करेल. अशी धमकी दिली. तसेच मुलीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. दरमयान, मुलीने तात्काळ एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार संशयिताविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे या करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button